अन्य

महाराष्ट्रात लातूर मध्ये फसवणुकीचा एक अजबच प्रकार 

Spread the love

आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

              मिळाल्या माहिती अनुसार लातूर इथून समोर आलेला असून सदर इसम कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आहै असे दाखवात लातूर शहरातील पोलीस ठाण्यात तो आलेला होता. पोलिसांनी देखील त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला आणि त्याला एक पोलीस गाडीसोबत एक अंगरक्षक दिला त्यानंतर तो अहमदपूर तालुक्यातील त्याच्या मूळ गावी गेला आणि एका राजकीय नेत्यासोबत विकास कामाच्या भूमिपूजनाला देखील उपस्थित राहिला न्यायाधीश म्हणून या व्यक्तीचा सत्कार देखील करण्यात आला. त्यावेळी तेथील गावातील काही ग्रामस्थ व्यक्तींच्या मात्र हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रकरणात काहीतरी काले-नीले असल्याचा त्यांना संशय आला आणि त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अधिक चौकशी करण्यात आली त्यावेळी हा इसम कुठला ही न्यायधीश नसून त्याचा खरा नाव मीरअली युसुफअली सय्यद, वय 32 वर्ष,राहणार इंडिया नगर लातूर असे निष्पन झाले. दरम्यान त्याने हा प्रकार का केला या साठी शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे अधिक तपासा करीता त्याला गुन्हा नोंद, ताब्यात घेण्यात आले आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत