राष्ट्रीय

राऊत कुटूबियांकडून मोफत अँब्युलन्स लोकार्पण सोहळा व महिला मेळावा   

Spread the love

राऊत कुटूबियांकडून मोफत अँब्युलन्स लोकार्पण सोहळा व महिला मेळावा        जव्हार तालुक्याची व्याप्ती पाहता येथील अधिक लोकसंख्या ही डोंगर वाडी वस्तीवर वास्तव्यास आहे, यात रात्री अपरात्री अतितातडीची वैद्यकीय उपचाराची परिस्थिती निर्माण झाल्यास वैद्यकीय संस्थेत पोहोचण्याकरिता गरीब जनतेस वेळेवर वाहन उपलब्ध होत नाही किंवा महामंडळाच्या बसच्या मर्यादित पर्यायाशिवाय गत्यंतर नाही ही बाब लक्षात घेता विनायक रावजी राऊत, शिवसेना तालुका प्रमुख जव्हार, गुलाब विनायक राऊत माजी सभापती जिल्हा परिषद पालघर, कल्पेश विनायक राऊत लोकनियुक्त सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडी यांच्या स्वखर्चातून गरजुंसाठी व आपल्या जनतेसाठी मोफत अँब्युलन्स उपलब्ध करून जनसेवेचा वसा जपला आहे. 

या करीता लोकार्पण सोहळा व महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ८००-१००० महिलांनी आपली उपस्थिती नोंदविली. जव्हार शहर वगळता तालुक्यात ४८ ग्रामपंचायत , दोन ग्राम दान मंडळ आणि १०९ महसुली गावे आहेत. शहरासह तालुक्यातील लोकसंख्या जवळपास दीड लाख एवढी आहे. शहरासह ग्रामीण भागात खासगी दवाखान्याची संख्याही अल्प व न परवडणारी आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता जव्हार शहरात एकमात्र रुग्णालय आहे. पर्याय नसल्याने सर्वसामान्य व मध्यमवर्गीय नागरिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयावर विसंबून राहतात. रात्री- अपरात्री अतितातडीची वैद्यकीय सुविधे साठी या रुग्णालयात धाव घेतात परंतु, ग्रामीण रुग्णालयाची क्षमता केवळ १०० खाटांची आहे, यात नाइलाजस्व गंभीर रुग्णांला जवळच्या नाशिक किंवा वापी शहरासाठी प्रवास करावा लागतो व वाचवता येणारा जीव बहुतेकदा गमवावा लागतो, हे सर्व राऊत यांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्यांच्या स्वकमाईतून जनतेस मोफत अँब्युलन्स देण्याचे ठरविले. जनतेच्या मोफत सेवेसाठी लोकार्पण सोहळा व महिला मेळावा प्रसंगी शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जव्हार पोलीस निरीक्षक किशोर मानभाव, विनायक रावजी राऊत, शिवसेना तालुका प्रमुख जव्हार, गटविकास अधिकारी चित्ते साहेब, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत रंधा, मोखाडा उपसभापती प्रदीप वाघ, युवासेना तालुका प्रमुख राजू भोये , सामाजिक कार्यकर्ते अशोक चौधरी, ओमकार कुवरा ,पत्रकार बंधू ग्राम उपसरपंच, सदस्य आणि कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.     प्रतिनिधी अर्शद अन्सारी जव्हार               मुख्य संपादक साजिद शेख मो ९८२२११७०३७/९८२२८१७०३७

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत