राष्ट्रीय

जव्हार शहरात अवैध व्यवसायाला मिळतेय खतपाणी; पोलीस यंत्रणा चाप बसविणार काय 

Spread the love

जव्हार शहरात अवैध व्यवसायाला मिळतेय खतपाणी; पोलीस यंत्रणा चाप बसविणार काय                                                         प्रतिनिधी शकील शेख जव्हार

जव्हार : ऐतिहासिक व संस्थांकालीन जव्हारला पर्यटनाचा ब दर्जा लाभला, शांत आणि स्वच्छ शहराला अवैध व्यवसायाने कालसर्पाने जसे वेटोळा मारला शहरातील भावी पिढी व्यसनाधीन होऊन जुगार ,मटक्याच्या नादाने बरबाद होण्याच्या मार्गावर आहे, अवैध व्यवसायाला शहरात खतपाणी मिळत असल्याची तक्रार आहे, हा सर्व प्रकार नियंत्रित करण्यासाठी पोलीस यंत्रणा विशेष मोहीम राबवून या सर्व बाबींवर चाप बसवणार का? अशी उत्सुकता शहरातील नागरिकांना लागली आहे.    एस.टी. बस स्टँडच्या बाजूला असलेल्या नगर परिषदेच्या मैदानात पडीक असलेल्या अतिक्रमित टपऱ्यांचा वापर गांजा, दारू व इतर कैक प्रकारच्या नशापाणी करण्यासाठी होत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे, याठिकाणी गावठी इंग्रजी दारू विक्रीचे प्रस्थ असलेल्या जव्हार पोलीस ठाणे हद्दीत जुगार,दारू गाळप व विक्री, अश्या अवैध व्यवसायालाही खतपाणी मिळत असल्याचे बोलले जात आहे. या व्यसणापाई छोट्या-मोठया चोऱ्या तर नित्याचीच बाब झाली आहे, येथे चालणाऱ्या जुगार अड्डयांवर धाड मारण्यापूर्वीच पोलीस येत असल्याची सूचना मिळत असते. पोलीस ठाणे हद्दीतील या प्रकाराला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चाप बसविण्याची गरज असल्याचे शहरात बोलले जात आहे          सदर मैदानात महामंडळ बस स्थानकात होणाऱ्या दुचाकी पार्किंगची वाट मोकळी करून दिल्यास येथे वर्दळ वाढून अवैध धंद्यांना चाप बसण्यास मदत होईल असे जाणकार मंडळींनी बोलतांना सांगितले. मुख्य संपादक साजीद शेख मो ९८२२८१७०३७/९८२२११७०३७

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत