वडाळागांव म. न. पा. उर्दू हायस्कूलची विद्यार्थिनी हिना अफरोज अहमद याने तिसरे क्रमांक पटकावले.
नाशिक प्रतिनिधी : माजिद खान
नाशिक महानगरपालिका राजीव गांधी भवन, नाशिक येथे म.न.पा. स्तरीय पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी *माझी वसुंधरा* अभियान अंतर्गत पोस्टर व विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. सदर प्रदर्शनात सर्व म.न.पा. प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या मध्ये म.न.पा. उर्दू हायस्कूल वडाळागाव, नाशिक येथील विद्यार्थिनी हिना अफरोज अहमद (इयत्ता ९ वी) तसेच महेताब अखलाक चौधरी (इयत्ता ८ वी) यांनी River Cleaning Water व Rain Water Harvesting हे विज्ञान उपक्रम सादर केले होते. उपक्रमाची पाहणी तसेच परीक्षण अतिरिक्त आयुक्त माननीय नायर मॅडम व प्रशासन अधिकारी नितीन पवार साहेब यांनी केले असता शाळेतील विद्यार्थिनी हिना अफरोज अहमद ( River cleaning water) हिला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ट्रॉफी व प्रशस्ती पत्रक माननीय नायर मॅडम अतिरिक्त आयुक्त म.न.पा. नाशिक यांचे हस्ते वितरीत करण्यात आले. या उपक्रमास विज्ञान शिक्षक गयासुद्दीन शेख व शाहना मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेस पुन्हा एकदा हिना अफरोज अहमद ने विज्ञान प्रदर्शनात तिसरे क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्वल केले त्याबद्दल मुख्याध्यापक इरफान शेख यांनी तिचे कौतुक केले.