गंगापुर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची सराईत गुन्हेगारांवर मध्यरात्रीच्या सुमारास सर्जिकल स्ट्राईक कामगिरी.
नाशिक प्रतिनिधी : माजिद खान
दिनाक: ०३/०५/२०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गंगापुर पोलीस ठाणे कडील पो. अं./२२४९ सुजीत जाधव यांना गोपनिय बातमी मिळाली की, गंगापुर पोलीस ठाणे कडील MPDA मधील फरार/पाहिजे असलेला इसम राहुल दिलीप जाधव हा नाशिक शहरात आला असुन त्याचे सोबत गंगापुर पोलीस ठाणे कडील तडीपार राहिल सैय्यद तसेच खंडणी व जाळपोळीच्या गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी अरबाज शेख असे शिवाजीनगर परिसरात एकत्र आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरुन गुन्हेशोथपथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी शिवाजीनगर परिसरात मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपीतांचा शोध घेतला असता सदरचे तिन्ही आरोपीतांना पोलीसांची चाहुल लागताच त्यांनी अंधाराचा फायदा घेवुन मोटारसायकलने सातपुर दिशेने पळ काढला, पोलीसांनी आरोपीतांचा सातपुर त्रंबक रोडने सिनेस्टाईल पाठलाग करुन त्यांना महिरावणी गावाजवळ थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी त्यांची मोटारसायकल रस्त्याच्या कडेला सोडुन शेतात पळ ठोकला, गुन्हेशोधपथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी चिकाटीने तिन्ही आरोपीतांचा शिफातीने पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले
इसम नामे १) राहुल दिलीप जाधव, वय २५ वर्षे, रा. धर्माजीकॉलनी, शिवाजीनगर, नाशिक याचेवर नाशिक जिल्हयात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घर जाळणे, खंडणी, धमकावणे तसेच विना परवाना शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे. सदर इसमावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा तो जुमानत नसल्याने त्याचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत तडीपारीचे आदेश काढण्यात आले होते. तरी सुध्दा त्याचे वर्तनात काहीएक सुधारणा झाली नाही. त्याने त्याचे तडीपारीचे आदेशाच्या कालावधीत दखलपात्र गुन्हे करणे सुरु ठेवले होते म्हणुन त्याचेवर MPDA कायदा अंतर्गत स्थानबध्दतेचे आदेश काढण्यात आले होते. त्याची त्याला चाहुल लागल्याने त्याने परराज्यात पळ काढला होता. सदर इसमांवर एकुण ०८ गुन्हे दाखल आहे.
२) अरबाज मोहम्मद शेख, वय २४ वर्षे, रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर, नाशिक याचेवर नाशिक जिल्यात खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे तसेच जाळपोळ, खंडणी यासारखे ०६ गंभीर गुन्हे दाखल आहे.
३) राहिल नुरुददीन सैय्यद, वय २४ वर्षे, रा. शिवाजीनगर, नाशिक याचेवर दंगा करणे विना परवाना शस्त्र बाळगणे, धमकावणे, गंभीर दुखापत करणे असे एकुण ०७ गुन्हे दाखल आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा.श्री. संदिप कर्णिक साो, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१, व मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. नितीन जाधव यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गंगापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जग्वेंद्रसिंग राजपुत, सपोनि/निखील पवार, गुन्हेशोध पथकाचे पोउनि/मोतीलाल पाटील, पोहवा /१८४६ गिरीष महाले, पोअं/२२४९ सुजीत जाधव, पोअं/२३०१ गोरख साळुंके, पोअं/१४३८ सोनु खाडे, पोअं/२२८८ तुळशीदास चौधरी, चालक पोना/८६० भागवत थवील, पोशि/१४४८ मच्छिंद्र वाकचौरे, पोअं. ९३० राकेश राऊत, पोअं. १३१३ मुकेश गांगुर्डे, यांनी केली आहे.