तीन महिन्याचे मानधन न मिळाल्याने लोककलावंत संतप्त
दक्ष पोलीस वार्ता प्रतिनिधी बाबूजी मुन्ना शेख नाशिक महाराष्ट्र सांस्कृतिक संचनालय कार्यालय मुंबई शासनातर्फे लोककलावंताना ५००० (पाच हजार)रूपयाचे तुटपुंजे मानधन देण्यात येते.
मात्र गेल्या फेब्रुवारी,मार्च, एप्रिल हया तीन महिन्यांचे मानधन लोक कलावंतांना मिळालेले नसल्याने, लोककलावंतामध्ये संतापाची लाट पसलेली आहे.
सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात लोककलावंताना मिळणारे पाच हजार रूपयाचे मानधन अतिशय तुटपुंजे आहे.
त्यातल्या त्यात तेही वेळेवर मिळत नाही.
कधी २७ तारिख, कधी २५ तारिख, अश्या महिना अखेरच्या काळात लोककलावंताना मानधन पाठवण्यात येते.
दर महिन्याच्या १० तारखेला लोककलावंताना मानधन वेळेवर देण्यात यावे.
अशी मागणी दक्ष पोलीस वार्ताच्या प्रतिनिधींशी बोलतांना लोक कलावंतानी केलेली आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्याचे मानधन न मिळाल्याने,गरजवंत लोक कलावंतावर जगावं की मरावं ?
असे म्हणण्याची वेळ आज आलेली आहे.
सरकारने लोक कलावंताच्या प्रश्नांकडे त्वरित लक्ष देऊन लोक कलावंताना न्याय दयावा.
अशी रास्त मागणी लोक कलावंताकडुन जोर धरत आहे.