पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी राजेश घुगे नासिक दि. २ मे,पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तीक लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. टोल फ्रि क्रमांक १९६२ देण्यात आला आहे. तरी पशुपालक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी २ जून २०२५ पर्यत ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावे, लागणारी कागदपत्र
१) आधार कार्ड
२) बँक पासबुक
३) मतदान कार्ड
४) मोबाईल नंबर
५) जातीचा दाखला असेल तर
६) प्रशिक्षण घेतले असेल तर प्रमाणपत्र
ही योजना प्रत्येक समाजासाठी आहे . असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई व म्हशीचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, १ हजार कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५+ ३तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रीया सन २०२५/२६ या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात संपर्क साधावा असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.