राष्ट्रीय

दिंडोरी बसस्थानकातून विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवा आदिवासी उलगुलान सेनेची निवेदनाद्वारे मागणी

Spread the love

दिंडोरी बसस्थानकातून विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवा आदिवासी उलगुलान सेनेची निवेदनाद्वारे मागणी

प्रतिनिधी रवी जगताप -चिंचखेड  

गेल्या काही दिवसापासून दिंडोरी बस स्थानकावर चालक व वाहक आदिवासी विद्यार्थ्यांची गैरसोय करत असून विद्यार्थ्यांना वेळेवर घरी व महाविद्यालयात जाण्यासाठी बस उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना बस स्थानकावर व फाट्यावर उभे राहावे लागते त्यामुळे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष द्यावे अन्यथा नागरिकांच्या व समाजाच्या रोशाला सामोरे जावे लागेल अशी मागणी आदिवासी उलगुलान सेनेच्या व राजा रावण किंग फाउंडेशन दिंडोरी तालुका अध्यक्षा

ललिता रामदास खंडवी, बचत गट अध्यक्षा शंकूतला गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवार रोजी सायंकाळी ५:०० ते ९:३० पर्यंत शाळेतील, महाविद्यालयातील व आयटी आय येथील विद्यार्थी व विद्यार्थीनीना दिंडोरी व वणी रोज ये जा करावी लागते मात्र या विद्यार्थ्यांना कोणत्याही बस मध्ये बस चालक व वाहक यांनी बस मध्ये घेतले नाही शिवाय चालक व वाहक विद्यार्थ्यांना चांगली वागणूक देत नाही अरेरावीची भाषा वापरतात. दुसरी बस येत आहे या बसमध्ये जागा नाही. हि मध्ये थांबत नाही असे उत्तर देऊन शालेय विद्यार्थ्यांना ताटकळत बस स्थानकावर दुसऱ्या बसची प्रतिक्षा करावी लागते.मात्र दुसरी बस आल्यावर त्यांच्याकडू देखील त्याच प्रकारे उत्तर विद्यार्थ्यांना मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाच्या बाबत चुकीची भावना निर्माण होत आहे त्यामुळे एसटी महामंडळ प्रशासनाने त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा तालुक्यातील नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागेल असे निवेदन अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याप्रसंगी उलगुलानसेनेच्या दिंडोरी तालुका अध्यक्षा ललिता खांडवी दिंडोरीच्या महिला बचत गटाचे अध्यक्षा शकुंतला गायकवाड, यांच्यासह राजा रावण किंग फाउंडेशन चे कार्यकर्ते तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत