सावधान आज रात्री १२/०० वा पासून ट्रक टेम्पो बंद कर्नाटकमध्ये चक्काजाम होणार
प्रतिनिधी अमित अग्रवाल पुणे
डिझेल दरवाढ , टोल दरवाढ, आरटीओ बॉर्डर चेक पोस्ट बंद करणे व इतर मागण्यांसाठी १४/ ४ /२०२५ च्या मध्यरात्रीपासून कर्नाटक राज्यामध्ये बेमुदत सर्व प्रकारची मालवाहतूक बंद करण्याचा निर्णय
फेडरेशन ऑफ कर्नाटक लॉरी ओनर्स अँड एजेंट असोसिएशन यांनी घेतलेला आहे शक्यतो दिनांक १२ व १३ तारखेला एप्रिल रोजी ट्रक टेम्पो कर्नाटक राज्यात भरून जाऊ नये आपली वाहने व चालक- मालक मालक कर्नाटकात अडकून पडेल कर्नाटकातील चक्काजाम आंदोलन बेमुदत आहे याची मालवाहणधारकांनी नोंद घ्यावी तसेच साखर धान्य रवा आटा मैदा कांदा बटाटा स्टील व्यापाऱ्यांनी व इतर व्यापाऱ्यांनी माल भरू नये दक्षता घ्यावी मालाचे व ट्रक टेम्पो सुद्धा नुकसान होईल
तरी त्या अनुषंगाने आपला कांदा ,बटाटा, साखर, इंडस्ट्रियल मटेरियल व इतर कर्नाटका त पाठवला जाणारा सर्व प्रकारचा माल १४ तारखेपर्यंत गाड्या परत येतील या हिशेबाने भरावा व आपल्या मालाचे वाहन धारकाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी व त्याबाबत कर्नाटक राज्यामध्ये माल पाठवण्याबाबतचे नियोजन करावे असे आवाहन सर्व व्यापारी उद्योजक कारखानदार यांना कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी केले आहे
यावेळी घेण्यात आलेल्या मिटींगला लॉरी अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ घोगळे , सेक्रेटरी हेमंत डिसले खजानिस प्रकाश केसरकर, संचालक विजय भोसले शिवाजी चौगुले जोसेफ फर्नांडिस जगदीश सोमय्या पंडित कोरगावकर विलास पाटील उपस्थित होते
उमाजी धाकतोडे जय संघर्ष सामाजिक संस्था क्षेत्र महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी अमित अग्रवाल पुणे