*मैत्रेय संघ ग्लोबलतर्फे संघदान आणि सन्मान सोहळा उत्साहात साजरा !!* प्रतिनिधी रत्नदीप जाधव नाशिकरोड
नुकताच चेंबूर येथे “मैत्रेय संघ ग्लोबल” या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही संघदान व सन्मान सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. वृद्ध व आजारी भिक्खू-भिक्खुनींसाठी संघदान करण्याचा संस्थेचा मुख्य उद्देश असून, यावर्षीचा कार्यक्रमही अत्यंत प्रेरणादायी ठरला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक संदीप मोरे, संगीती फाउंडेशनचे सर्वेसर्वा व ख्यातनाम धम्मसेवक वैभव सोनावणे, ललिता सोनवणे (सिनियर मॅनेजर – स्टार हेल्थ इन्शुरन्स) तसेच आदर्श उपासिका, विचारवंत आनंद मस्के, संजय चव्हाण आणि साहित्यिक व कवी विलास देवळेकर ह्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच भिक्खुनी महाथेरी रुपानंदा व माताजी धम्मदर्शनी यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. विचार मंचावरील मान्यवरांचे ‘पुष्पगुच्छ’ देऊन स्वागत करण्यात आले. काही मान्यवरांनी आपल्या भाषणात भावना व्यक्त केल्या. आणि प्रसिद्ध कवी विलास देवळेकर यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर इको साऊंड सिस्टीम मध्ये म्युझिकल कविता सादर केली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आनंद व्यक्त केले.
संघदानासोबतच समाजासाठी निःस्वार्थी सेवा करणाऱ्या व्यक्तींना “धम्मसेवक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. जगभरात धम्म प्रचार करणारे बोधिसेन जी, तसेच सर्जेराव कांबळे व उषा ज्ञानदेव कांबळे यांना “जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आले. धम्मसेवक पुरस्कार प्राप्त व्यक्ती आदरणीय विष्णू खरे, विशाखा ढगे ताई, कविता शिकतोडे ताई, धनंजय शिराळ, मिलिंद जगताप, सत्यजित अहिरे, प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर विनीत कदम आणि प्रसिद्ध यूट्युबर प्रफुल वर्धमान. याशिवाय, शिवाजी साळवे व कुटुंबीयांचा “आदर्श बौद्ध कुटुंब” म्हणून विशेष सन्मान करण्यात आले. सर्व पुरस्कारथींना शाल घालून, पुष्पगुच्छ देऊन, आणि स्मृतिचिन्ह देऊन ‘सत्कार’ करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय वसंतराव लोखंडे यांनी भूषवले, तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन बाळकृष्ण तांबे (नालंदा क्लासेस) यांनी केले. सर्व उपस्थितांना अल्पोपहार वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन
मैत्रेय संघ युवा टीम- दीपाली डोळस, रोहन साळवे, प्रज्ञा रणदिवे, प्रतीक अहिरे, सुनीता अहिरे, करण साळवे, पल्लवी सुरवडे आणि बाळू रणदिवे यांनी परिश्रमपूर्वक आयोजनाची जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन बुद्ध प्रिया रणदिवे यांनी केले.