राष्ट्रीय बहुजन महासंघातर्फे नाशिक येथे कुटुंब सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका
प्रतिनिधी रत्नदीप जाधव नाशिकरोड
हि संकल्पना स्विकारुन जनतेच्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून जनतेच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय बहुजन महासंघ सर्वोतोपरी कार्यरत आहे.सोमवार दि.२४ मार्च २०२५ रोजी, वेळ सायंकाळी:-५:३० वाजता ठिकाण:-कुबेर हौसिंग सोसायटी गार्डन, बेला डिसोझा रोड, भीमनगर जेलरोड, नाशिकरोड येथे संघटनेचे नाशिक येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाले. सालाबाद प्रमाणे राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या राज्य स्तरिय अधिवेशनाचे औचित्य साधून सामाजिक,राजकिय सांस्कृतिक कला क्षेत्रात व व्यावसायिक क्षेत्रात प्रभावी व प्रामाणीकपणे आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्तींचा व त्यांच्या कुटुंबाचा राष्ट्रीय बहुजन महासंघाकडुन सन्मान चिन्ह देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.मोगल जाधव यांनी संविधानातील मुलभूत अधिकार व संविधाना प्रति देशातील नागरिकांची कर्तव्ये या विषयावर प्रखर व्याख्यान दिले.कार्यकमाचे अध्यक्षस्थान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू सोरटे यांनी भूषवले. या कार्यक्रमाला अँड.शशीकांत उन्हवणे,याप्रसंगी साहित्यिक कवी पत्रकार रत्नदीप जाधव (राजरत्न), साहित्यिक कवी पत्रकार:-रविंद्र मालुंजकर उल्हास गांगुर्डे, लक्ष्मण पगारे, विश्वास चंद्रमोरे, रोहित जाधव, सौ. विमलताई प्रभाकर जाधव, उषाताई भालेराव, तुषार वाघमारे,
बौद्धाचार्य:-बाळासाहेब अहिरे, सौ.सुरेखाताई जाधव व संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष शशिकांत कटारे आदी मान्यवरांचा गुलाब पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह प्रधान करून गुण गौरव करण्यात आला. उपस्थितीत महिला पुरूष नागरिकांच्या उपस्थितीत हा कुटुंब सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला.
सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी अर्णव जाधव, जगदीश पवार, तन्वी जाधव, राकेश जाधव, निखिल जाधव,हर्षल गांगुर्डे,दिपक गांगुर्डे,सुरज पगारे यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची धुरा मिसबा यांनी सांभाळली.महिला पुरूष नागरिकांनी या सोहळयास मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.