- एसएमबीटी हॉस्पिटलजवळ झालेल्या अपघातात ३ जण ठार प्रतिनिधी सुरेश सांगळे सिन्नर
एसएमबीटी हॉस्पिटलजवळ सिन्नर घोटी हायवे वर अपघातात ३ ठार झाले असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षा क्र एम एच ०१ ए एफ ०४५८ ने कंटेनर क्र एन एल एफ ०४५८ला धडक दिली सायंकाळच्या सुमारास सिन्नरकडे जात असतांना सिन्नरहुन घोटीकडे समोरून येणाऱ्या कंटेनर आणि रिक्षा यांचा भीषण अपघात झाला. ३ जण ठार तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राम व्होंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना एसएमबीटीच्या रुग्णवाहीकेतुन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रिक्षाचालक अमोल विनायक घुगे, वय २५ रा. नांदवली, कल्याण हा जागीच ठार तर मार्तंड पिराजी आव्हाड वय ( ६० ) स्वरा अमोल घुगे वय (४) यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. प्रतीक्षा अमोल घुगे वय (२२ )कलावती मार्तंड आव्हाड वय( ५८ ) कल्याण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत ट्रकचालक राहुल कुमार प्रजापती वय ( २८ ) याला सहायक पोलीस निरीक्षक राम व्होंडे यांनी पुढील तपासासाठी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या ताब्यात देण्यात आले सदर अपघात हा रिक्षा चालकाने ओव्हरटेक केल्यामुळे झाला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राम व्होंडे यांनी दिली आहे