CNG गॅस पंप संप एक महिन्यासाठी स्थगित प्रतिनिधी राजेंद्र घुगे नासिक
नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनने विस्कळीत पुरवठ्याच्या विरोधात दिनांक 26 एप्रिल 2025 पासून नाशिक जिल्ह्यात सीएनजी विक्री बंद पुकारण्याचे जाहीर केलेले होते. त्याचे अनुषंगाने आज रोजी दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी महानगर नॅचरल गॅस लिमिटेड व ऑइल मार्केटिंग कंपनी आणि नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर वेल्फेअर यांचे प्रतिनिधी यांचे दरम्यान महानगर गॅस लिमिटेड (MNGL) यांचे कार्यालयात बैठक पार पडली. सदर बैठकीसाठी श्री सुजित रुईकर व्हाईस प्रेसिडेंट, मार्केटिंग MNGLव श्री माणिक कदम ऑपरेशनल हेड MNGLहे पुणे येथून आलेले होते. सदर बैठकीत त्यांनी त्यांचे गॅस सप्लाय बाबत असलेल्या अडचणींचे कथन केले. त्यानुसार सध्या त्यांना ट्रान्सपोर्ट मार्फत होणाऱ्या एलएनजी सप्लाय मध्ये अडचण होत असल्यामुळे सदरचा तुटवडा होत आहे त्यांकरती त्यांनी नव्याने 5 लॉरी चे टेंडर करून हा सप्लाय वाढवत असल्याचे नमूद केले. सर्व पूर्ववत होण्यासति एक आठवडा वेळ लागणार आहे. त्याच प्रमाणे येत्या सहा महिन्यात नाशिक शहर हे मुंबई डेपोशी पाईपलाईन मार्फत कनेक्ट होण्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते सहा महिन्यात पूर्ण होऊन सदरचा सीएनजी तुटवड्याचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचे आश्वासक माहिती दिली. त्यानुसार सदर मीटिंगमध्ये खालील प्रमाणे पुरवठ्याबाबत संयुक्त निर्णय घेण्यात आलेले आहेत नाशिक शहरात महानगर गॅस चे 4 पंप सोडून जे उर्वरित चार पंप ऑनलाईन आहेत त्यांना किमान सकाळी 06 ते संध्याकाळी 10 पर्यंत नियमित पुरवठा एमएनजीलमार्फत देण्यात येईल व जे सुमारे 31 पंप नाशिक शहर व ग्रामीण मध्ये सुरू आहेत त्यांना गाडी मार्फत पुरवठा होत असल्याने सदर पंपांना देखील रोजचा किमान 3000 किलो सीएनजी नियमितपणे पुरवठा करण्यात कंपनी प्रयत्नशील असणार आहे त्यामुळे असोसिएशन ने बंद पुकारू नये असे अवहान महानगर गॅस कडून करण्यात आले, त्यांचे आव्हानास प्रतिसाद म्हणून नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशन यांनी त्यांचा बंद हा एक महिन्यासाठी स्थगित केलेला असून सदरच्या पुरवठ्याबाबत एक महिन्यानंतर बैठक घेऊन त्यात किती सुधारणा झाली याबाबत आढावा घेण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आलेले असून ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची काळजी महानगर गॅस कंपनीकडून घेतली जाईल असे कंपनीकडून आश्वस्त करण्यात आले . सदरच्या बैठकीसाठी महानगर गॅस लिमिटेडचे श्री सुजित रुईकर श्री माणिक कदम, संदीप श्रीवास्तव फामपेडा उपाध्यक्ष भूषण भोसले , फामपेडा सचिव सुदर्शन पाटील तसेच नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष तेहसीन खान, सेक्रेटरी अमोल बनकर, साहेबराव महाले अमोल आढाव, रवी ठाकरे,शाम दुसाने व इतर पदाधिकारी आणि डीलर्स तसेच ऑइल कंपनी बीपीसीएलचे अंग ताशी शेर्पा एचपीसीएल चे प्रथमेश सोनवणे आयओसीएल चे देवेंद्र पाटील हे सर्व उपस्थित होते.
नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशन.