Uncategorized

७०वर्षीय वृद्ध महिले चा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू की घातपात

Spread the love

विच्छेदन अहवाला नंतर सत्यसमोर येणार चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड या गावी येथून दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या वृद्धमहिलेचा उसात मृतदेह सापडला वृद्धेमहिले चा मृत्यू बिबट्याने केला अशी वार्ता गावात पसरली त्यामुळे बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे घटनास्थळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस पोचल्यानंतर वृध्येचा मृत्यू नेमका बिबट्याच्या हल्ल्यामुळे झाला की घातपात आणखी काही दुसरे कारण त्याला कारणीभूत आहे हे अद्याप समजू शकले नाही दरम्यान शेव विच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या घटनेचा उलगडा होणार आहे. याबाबतीत माहिती अशी उंबरखेड येथील हिरकणाबाईजावळे कोळी वय 70 ही वृद्ध महिला दोन दिवसापूर्वी लाकडे घेऊन येत असे घरी सांगून दुपारी घरातून निघाली मात्र घरी परतली नाही. सोमवारी ता ७ रोजी सकाळच्या शिवारात राजेंद्र पाटील यांच्या शेताजवळ काही शेतकऱ्यांना उग्र वास येत असल्याने गावातील काही जणांनी उसाच्या शेतात शोध घेतला असता फिरकणी बाईचा मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती तत्काळ उंबरखेड पोलीस पोलिसांना देण्यात आली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे हवलदार श्री सोनवणे दीपक महाजन घटनास्थळी आले पंचनामा करून मृतदेह सरकारी दवाखान्यात पाठवले वरील तपास उंबरखेड पोलीस स्टेशन करीत आहे प्रतिनिधी प्रशांत जोशी उंबरखेड

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत