राष्ट्रीय

सम्यक दर्शन साहित्य समूह सोलापूर तर्फे महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी/कवयित्री स्पर्धा निकाल जाहीर

Spread the love

सम्यक दर्शन साहित्य समूह सोलापूर तर्फे महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी/कवयित्री स्पर्धा निकाल जाहीर

महाराष्ट्राचे उत्कृष्ट कवी पत्रकार रत्नदिप जाधव, तर महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री ठरल्या सौ. सुनंदा अंभोरे (छत्रपती संभाजी नगर)

सोलापूर,

समाजातील तळागाळापर्यंत बौद्धिक प्रगती होऊन मनुष्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अनेक महापुरुषांनी, संतांनी, समाजसुधारकांनी समाजाला महत्वपुर्ण असे मार्गदर्शन केले आहे. लेखनाद्वारे, भाषणाद्वारे, भजन, कीर्तन, प्रवचन, नृत्य, कविता, गीते, नाटक, इत्यादी च्या माध्यमातून प्रबोधन केले गेले. आधुनिक जगात वावरतांना मनुष्य चांगल्या विचारापासून भरकटला जाऊ नये. यासाठी आजच्या काळात देखील विविध प्रकारच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन सुरूच आहे. असाच एक प्रामाणिक प्रयत्न सोलापूर येथील “सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय मंचाचा” आहे.

या अनुषंगाने “सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय मंच” यांचे तर्फे ३० सप्टेंबर ते ५ आँक्टोबर २०२४ आठवडी काव्यलेखन स्पर्धा क्रमांक:-१ घेण्यात आली होती. या स्पर्धेचा विषय होता, “बुद्धांची शिकवण”. या काव्यलेखन स्पर्धेत महाराष्ट्रातील कवी आणि कवयित्रींनी सहभाग घेतला होता. या काव्यलेखन स्पर्धेत “महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी” हा सन्मान यावेळी कवी: पत्रकार रत्नदिप जाधव (नाशिक)यांना देण्यात आला. त्यांनी “निर्वाण पद” हि कविता सादर केली आहे. त्यांना समूहाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. कवी:- पत्रकार रत्नदिप जाधव हे नाशिकचे असुन त्यांनी अनेक वृत्तपत्रांतून चारोळ्या, कविता, लेख, वात्रटिका ई. लेखन केले आहे. अनेक वृत्तपत्रांचे/चँनलवर संपादक पदावर काम केलेले आहे. तसेच त्यांनी काही चित्रपटांचे तसेच यूट्यूबवर गीतांचे लिखाण केलेले आहे.काव्य संमेलनात पुरस्कार प्राप्त केलेले आहे. नाशिक आकाशवाणीवर त्यांच्या कवितांचे कार्यक्रम सादर झालेले आहेत.व त्यांनी नाटकांत देखील भूमिका केलेल्या आहेत. “महाराष्ट्राच्या उत्कृष्ट कवयित्री ” चा मान मिळाला आहे सौ. सुनंदा अंभोरे, छ. संभाजी नगर यांना. त्यांनी ” भगवान बुद्ध ” ही कविता सादर केली आहे. आजवर अनेक वृत्तपत्र व प्रातिनिधिक काव्यसंग्रहात त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. दोन्ही कवींचे समूहाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. काव्य स्पर्धेचे परिक्षण देविदास गायकवाड,

सुनिता तागवान,यांनी केले‌.

थोर समाजसुधारक व संतांच्या शिकवणीतून समाजाचे प्रबोधन सातत्याने होत रहावे. या प्रांजळ हेतूने या आँनलाईन साहित्य समूहाची निर्मिती करण्यात आली आहे. या समूहाचे संस्थापक मा. देविदास गायकवाड तसेच सौ. सुनिता तागवान हे असून वैशाली सुर्यवंशी व सुजाता उके ह्या प्रशासिका आहेत.

प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धा घेतली जाईल. प्रत्येक आठवड्यात एक कवी व एक कवयित्री यांना हा सन्मान दिला जाणार आहे. तेव्हा सातत्याने होणाऱ्या पुढील स्पर्धांमध्ये साहित्यिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत