अन्य

पुण्यात मित्राच्या पत्नीवर बलात्कार आरोपीमध्ये चक्क एक महिला

Spread the love

सुमित अगरवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पुणे

                 शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून मित्राच्या पत्नीला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका व्यक्तीला बेड्या ठोकलेल्या आहे. आरोपी व्यक्तीने महिलेच्या मुलाचे अपहरण करून तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याची देखील तिला धमकी दिलेली होती.

                   उपलब्ध माहितीनुसार, साजिद मोहम्मद अली कुंजू ( वय 39 राहणार शास्त्रीनगर येरवडा) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याची नातलग असलेली हसीना हिच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी याने तक्रारदार यांना तिच्या मुलाचे अपहरण करून तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याची धमकी दिलेली होती.

                 उपलब्ध आरोपी कुंजू हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र असून त्याने तिच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवले होते सोबतच जर माझ्याशी मैत्री केली नाही तर तुला मारून टाकेल. तुझी छायाचित्रे सोशल मीडियात व्हायरल करून तुझी बदनामी करेल असे देखील तो म्हणाला आणि त्याही पुढे जात त्याने तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याची तसेच तिच्या मुलाचे अपहरण करण्याचे देखील धमकी दिलेली होती. आरोपी याने तिला धमकावून तिच्यावर अनेकदा बलात्कार केला तसेच तिच्याकडे पैशाची देखील मागणी केली असेही पीडितेचे म्हणणे आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत