रवि जगताप / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता
म्हाळसाकोरा येथे सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान शेतीतील द्राक्ष बागेचे काम आटोपून घरी परतणाऱ्या आईच्या हातातील पाच वर्षाच्या चिमुकल्याला बिबट्याने ओढून घेऊन मकाच्या शेतात जखमी केले. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूदेह शवछेदनासाठी निफाड येथे पाठविण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, म्हाळसाकोरे येथे दत्तू मुरकुटे यांच्या वस्तीवर सुरगाणा तालुक्यातील म्हैसखडक येथील शेतमजूर द्राक्ष कामासाठी आलेले असतांना मुलाला घेऊन आईवडील द्राक्ष कामासाठी गेले होते सायंकाळी आई निर्मला आपल्या ठिय्यावर परतत असतांना तिच्या हातात रोहन हिरामण ठाकरे वय – ७ (सात) वर्षाचा मुलगा होता. मका शेतात दबा धरून असलेल्या बिबट्याने मुलाला शेतात ओढून नेत गळ्याला जखमी केले वेळी आई निर्मला ने जोरदार आरडा ओरडा केला आणि आजूबाजूचे जवळपास 50 शेतकरी जमा झाले शेतकर्यांनी मकाच्या शेताकडे धाव घेतली असता बिबट्याने मुलाला सोडून पळ काढला, जखमी मुलाला आईने पाहताच एकच टाहो फोडला, परंतु याठिकाणी मुलाचा जागीच मृत्यू झाला.
काल सायंकाळच्या वेळेस शेतकऱ्यांना बिबट्या दिसला होता बर्याच दिवसापासून याच परिसरात बिबट्या असल्याने वनविभागाने पिंजरा लावला होता रागाने लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष नसल्याने बिबट्या येणार कसा, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. वन विभागाचे कर्मचारी केवळ पिंजर्यामध्ये दोन कोंबड्या ठेवून निघून जातात. त्याचा प्रमुख भक्ष असलेले शेळी किंवा मेंढी नसल्याने बिबट्या या पिंजऱ्याकडे फिरकतही नाही. वन विभाग नागरिकांच्या मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते वेळेवर पिंजरा लागत नाही लागला तर, त्यामध्ये भक्षही नसते. त्यामुळे बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी लहान मुले जनावरे यांच्यावर वारंवार हल्ले चढवत आहे.तरी नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037