प्रतिनिधी अमित अग्रवाल पुणे
पुणे हिंजवडी कंपनीच्या कामगारांना घेवून जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला शॉटसर्किट मुळे भीषण आग चार कामगार दुर्दैवी मृत्यू हिंजवडी पुणे येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज वन’मध्ये आज सकाळच्या सुमारास एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.व्योमा ग्राफिक्स कंपनीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर आज सकाळी अचानक शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
या आगीत चौघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोघांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली आहे.
व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या या टेम्पोमध्ये एकूण 12 कर्मचारी प्रवास करत होते. हिंजवडी फेज वन मध्ये येताच अचानक चालकाच्या पायाखाली आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीने टेम्पो ट्रॅव्हलर मधून खाली उतरले. मात्र टेम्पो ट्रॅव्हलरचा मागचा दरवाजा उघडला नसल्याने चौघांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. जखमींना हिंजवडी परिसरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे.
( 1 ) सुभाष सुरेश भोसले वय 42 रा. वारजे ( 2 ) शंकर शिंदे वय 58 रा. नऱ्हे ( 3 ) गुरूदास लोकरे वय 40 रा. हनुमान नगर, कोथरूड ( 4 ) राजू चव्हाण वय 40 रा वडगाव धायरी चौघां कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह Y C M ला नेण्यात आले आहेत.
चालक जनार्दन हुंबर्डेकर वय 57 रा. वारजे संदीप शिंदे वय 37 रा. नऱ्हे विश्वनाथ जोरी वय 52 रा. कोथरूड या तिघांवर हिंजवडीतील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत. तर प्रविण निकम वय 38 चंद्रकांत मलजी वय 52 रा. दोघेही कात्रज यांना पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.