सुमित अगरवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पुणे
पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून गेल्या दीड वर्षांपासून पत्नीपासून वेगळे राहत असलेल्या पती ने चक्क तिची बनावट सही चेकवर करून तो चेक बँकेत जमा करत फसवणुकीचा प्रयत्न केलेला आहे यानंतर या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात फिर्याद दिलेली असून 20 डिसेंबर रोजी ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, आनंद अशोक पालवे ( वय 34 राहणार वाघोली ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून फिर्यादी महिलेचा 2018 मध्ये पालवे याच्यासोबत विवाह झालेला होता. 2022 मध्ये त्यांनी घटस्फोटाचा दावा दाखल केला होता त्यानंतर 23 डिसेंबर 2022 रोजी एक चेक बाउन्स झाल्याचा त्यांना मेसेज आला त्यावेळी चौकशी केली तेव्हा हा प्रकार आनंद पालवे याने केल्याचे समोर आले त्यानंतर त्यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल होत त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98228 17037 / 98221 17037