अन्य

चांदवड पाणीपट्टी वाड विरोधात रिपब्लकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ). नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले

Spread the love

नाहिद शेख / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , चांदवड

                   चांदवड नगरपरिषदेने उपविधी २०२३ चा मसुधा वाढीव पाणीपट्टी तो आतिशय संताप जनक आहे. चांदवड शहरात गोरगरीब व कष्टकरी लोक राहतात.वार्षिक पाणीपट्टी ११०० रुपये असून सुद्धा लोकानकडे ती पाणीपट्टी भरण्यासाठी पैसे नाहीत व चांदवड नगरपरिषदेने जो उपविधी काढलेला आहे .यामध्ये गोरगरीब व कष्टकरी जनतेची नगरपरिषद छळवणूक व पिळवणूक करत आहे . जनतेने ऐवढी वाढीव पाणीपट्टी कुठून व कशी भरावी अशे प्रश्न जनतेला बेडसावत आहेत . गोरगरीब व कष्टकरी जनतेला २५ रुपयात १००० लीटर पाणी परवडणारे नाही.त्याच बरोबर जनतेला नगरपरिषदेने पाण्याचे मिटर बिल देखील लावू नये.शहरातील जनतेला उपविधी व त्या मधील आटी व शर्ती आहेत त्या जनतेला मान्य नाही .शहरातील नागरिकांना ११०० रुपये ते पाणीपट्टी आसून देखील ती पाणीपट्टी भरण्यासाठी भरायला पैसे नाहीत व त्यात ज्या लोकांची पाणीपट्टी बाकी आहे आश्या लोकांचे घराचे नळ कनेक्शन मोठ्या प्रमाणात कट करण्यात आलेले आहे .जनतेला पाण्यासाठी फार मोठी भटकंती व पायपीट करावी लागते. पाणी हा जीवनातील एक विभाज्य घटक आहे . पाणीपट्टी दर वाढल्या मुळे जनतेमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले आसून शासनाने सामान्य जनतेवर अन्याय करू नये. आधीच मागील तीन वर्षापासून कोरोणा मुळे जनता व्यापून गेलेली आहे व शासन मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी वसूल करून जनतेचा छळ करत असल्यामुळे जनात खूप मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेली आहे . शासनाने नागरिकांना ५ रुपया मध्ये १००० लीटर पाणी द्यावे व नगरपरिषदेने लोकान कडून नवीन नळ कनेक्शन जोडण्यासाठी जे १०००० ते १५००० रुपये घेणार आहे ते शासनाने जनते साठी निःशुल्क करावे पाणीपट्टी देखील ११०० ते १४०० रुपये करण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाा (आठवले) नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने नगरपरिषदे समोर आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व त्यानंतर कायदा सूवेवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस आपण सर्वस्वी जबाबदार रहाल याची शासनाने नोंद घ्यावी.

                  नगरपरिषदेचे मुख्यधिकारी किरण देशमुख व पाणीपुरवठा आधिकारी गायकवाड साहेब यांना निवेदन देताना,राजाभाऊ आहिरे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) नाशिक जिल्हा उपाध्यक्ष चांदवड, जि,नाशिक व यावेळी उपस्थित कार्यकर्ते रवी बनकर,कैलास जाधव,बाळू साळवे,किशोर आढाव,केदबाबा कापसे, देवा निरभवणे,पिंटू धीवर,संजय निरभवने,सुभाष आढाव, सत्तार पिंजारी, दिपक जाधव,विजू केदारे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत