अन्य

नासिक कब्रस्तान बचाव समिती तर्फे नासिक महानगर पालिका विरोधात हायकोर्टात धाव

Spread the love

 दानिश शेख / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , नासिक

                 नासिक नानावली व वडाळा गाव येथील आरक्षित कब्रस्तान साठी नाशिक शहर मध्ये कब्रस्तान विषय आज एक सभा घेण्यात आली नाशिक महानगरपालिके कडुन सतत मुस्लिम समाजाची दिशाभूल करून कुठलेही कारण देऊन कामात दिरंगाई करण्यात येत आहे नाशिक महानगरपालिका 2005 साली ननावली कब्रस्तानसाठी रिझर्वेशन जागा ठेवलेली होती पण अजूनही मुस्लिम समाजाच्या ताब्यात न दिल्यामुळे काही लोकांनी कब्रस्तान विषयी विचारणा केले असताना नाशिक महानगरपालिका कडून उडवा उडवी चे उत्तर देण्यात आले म्हणून नाशिक शहरचे मुस्लिम समाजा कडून अजिज पठाण यांनी आपल्या हक्कासाठी हायकोर्टात धाव घेतलेली मुंबई उच्च न्यायालयाने सप्टेंबर 2022 मध्ये आदेश देऊन सुद्धा म. न. पा. प्रशासनाने टाळाटाळ केली आणी वडाळा येथील जागेचा उल्लेख केला त्या बाबत चौकशी केली असता मा. जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव परत पाठविले आहे म्हणून मुस्लिम समाजाच्या वतीने अजिज पठाण यांनी पुन्हा मुबंई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या बाबत समाजास सविस्तर माहित देण्यात आली. तरी सर्व नाशिककरांना आव्हान करण्यात आलं की आपल्या शेवटच्या घरासाठी लढण्यासाठी काही रक्कम लागत आहे तरी आपण सर्वांनी हातभार लावावा कारण की हा आमचा शेवटचा घर आहे तुम्ही हात दिल्यास नाशिक महानगरपालिका ला ही जागा आम्हाला द्याविच लागेल सभा चालू असताना एका चिमुकली हाऊ चे पैसे देखील कब्रस्तानच्या केस साठी दिलेले आहे तरी सगळ्या नाशिक समाजाच्या लोकांनी या चिमुकली कडून काय शिक्षण घेण्यासाठी उत्सुक रहावा जर तुम्ही या केससाठी हातभार लावला तर निश्चितच ही केस आपल्याकडं लागेल आणि अंतिम क्रियाक्रमा साठी ही जागा आपल्याला उपलब्ध होईल अशी सर्व नाशिककारांना आवाहन करण्यात येत आहे सदर कर्यक्रमा साठी हाफिज हिसामुद्दीन खातीब, अजमेरी मशीदीचे बरकाती, वसीम पिरझादे, अजिज पठाण,एजाज रझा, सलीम खान, मुखतार शेख, मजीद पठाण, इब्राहिम अत्तार, शफिक काझी, रशीद शेख, इत्यादी असंख्य कर्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी कबरस्थान बचाव समिती च्या वतीने अजिज पठाण यांनी घोषणा केली की रमजान महिन्यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने नाशिक महानगरपालिके वर 10 हजार नागरिकांचा मोर्चा धडकणार आहे त्या अगोदर महानगर पालिकेने निर्णय घ्यवा. मुस्लिम समाजाचा अधिकार आहे घेतल्याशिवाय राहणार नाही संविधान सर्वांसाठी आहे आणि आम्ही देखील संविधानला मानणारे आहे संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण देशासाठी कायदेशीर लढून आपला हक्क घ्यावा ही शिकवण दिलेली आहे.

कब्रस्तान बचाव समिती नाशिक

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत