अन्य

मुंबई गोवा महामार्ग क्र.66 वर अवजड वाहनांची वाहतूक 30 सप्टेंबरपर्यंत बंद जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी दिले आदेश

Spread the love

सुजाता साळवे/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,मुंबई


गौरी गणपती सणासाठी मुंबई गोवा महामार्ग क्र.66 वर अवजड वाहने वाहतूक 30 सप्टेंबरपर्यंत बंदीबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. गणेशोत्सव 2023, 19 सप्टेंबर रोजी पासून साजरा होत आहे. या सणानिमित्त कोकणात जाणा-या भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात असते मुंबई गोवा क्र.66 वर जाणारी अवजड वाहतूक बंद करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यानी महाराष्ट्र शासन गृहविभाग क्र.एम.व्ही.ए-0589/सीआर/1061/टीआरए-2, 19 मे 1990 चे अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायदा कलम 115,116 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

                   मुंबई-गोवा महामार्ग क्र. 66 वर 5 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 गणेशोत्सव सण पूर्ण होईपर्यत अवजड वाहतुक बंद करण्यात येत आहे. हा आदेश पेट्रोल, डिझेल, दूध स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड, मेडीकल ऑक्सीजन, औषधे व भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारे वाहने वगळून तसेच अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलीस वाहन एसटी महामंडळ बसेस, ट्रॅव्हल्स बसेस व अत्यावश्यक सेवेतील अशा सर्व वाहनांना लागू असणार नाही.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत