अन्य

हर हर गोदे, नमामि गोदे! नाशिकमध्ये गंगाआरतीसाठी 5 कोटींचा निधी

Spread the love

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

                   अयोध्या, हरिद्वार, वाराणसीच्या धर्तीवर नाशिकमध्येही गोदाघाटावर रोज गंगा आरती सुरू होणार आहे.

                 सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाशिकच्या गोदाघाटावरील गंगा आरतीसाठी पाच कोटींच्या विशेष निधीची तरतूद करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. त्यानुसार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी शासकीय यंत्रणेला आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहे. या निधीतून नाशिकच्या गंगाघाट परिसराचा कायापालट व सुशोभीकरण करण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे.

              नाशिक शहरातून दक्षिण भारताची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी जाते. गोदावरीच्या काठावर सिंहस्थ कुंभमेळा भरत असल्यामुळे येथील धार्मिक महत्व मोठे आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने यापूर्वी पुरोहित संघाला काही निधी देऊन रोज गंगाआरती सुरू केली आहे. मात्र, पुरेसा निधी नसणे व त्यासाठीच्या पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे ही गंगाआरती भव्य स्वरुप धारण करू शकलेली नाही. यामुळे नाशिकचे महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी नाशिकमध्ये गोदाघाटावर गंगाआरती भव्य स्वरुपात घेण्यात यावी यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाला निवेदन दिले होते. त्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागील आठवड्यात नांदेड येथे महंतांची बैठक घेऊन आरतीसाठी विशेष पाच कोटीचा निधी मंजूर करणार असल्याचे जाहीर केले. यामुळे लवकरच गोदाघाटावर गंगा आरती भव्य प्रमाणात होणार असून त्यासाठी अकरा चबुतरे बांधण्यात येणार आहे.

                  गोदाघाटावर श्रीराम व सीतामाई यांच्या भव्य मूर्तींची स्थापना केली जाणार असून गादाघाटाचे सुाोभीकरण केले जाणार आहे. सांस्कृतिक मंत्र्यांच्या सूचनेनंतर महंत अनिकेतशास्त्री, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, बांधकाम व्यावसायिक दिनेश चंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यात गंगा आरतीसाठीचा आराखडा तयार करून तो राज्य शासनाला सादर करण्याचा निर्णय झाला. नवीन वर्षापासून गोदाघाटावर गंगाआरती भव्य स्वरुपात केली जाणार असल्याचे यावेळी निश्‍चित करण्यात आले.

साजिद शेख 

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता 

संपर्क : 98228 17037 / 98221 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत