अन्य

पोरींचा कॉलेजमध्ये राडा, केस ओढत एकमेकींना धू-धू धुतलं

Spread the love

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

               भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गल्लीबोळात भांडताना, रस्त्यावर भांडताना, बाजारात भांडताना. पण हे बरेच व्हिडीओ मुलांचे असतात, माणसांचे असतात. पण सध्या कॉलेजमधल्या पोरींचा हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

               नाशिकच्या गंगापूररोडवरील नामांकित एका महाविद्यालयात हा प्रकार घडला. यात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. व्हिडीओमध्ये तरुणींमध्ये कॉलेजच्या आवारातच हाणामारी सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. यात त्या एकमेकींचे केस ओढून मारहाण करताना दिसत आहेत.

                या तरुणींमध्ये नेमका कोणत्या कारणावरुन वाद झाला, हे अद्याप समजू शकलेलं नाही. व्हिडीओमध्ये चार तरुणी दिसतात. यातील दोघी एकमेकींचे केस ओढून हाणामारी करत आहेत. तर, इतर दोघी ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : 98228 17037 / 98221 17037 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत