अन्य

होरायझन ॲकाडमी निफाड मध्ये गोपालकाला उत्साहात साजरा

Spread the love

दिनेश गोसावी / संपादक – दक्ष पोलीस वार्ता


मराठा विद्या प्रसारक समाज संचलित होरायझन ॲकाडमी निफाड मध्ये निज श्रावण कृष्ण अष्टमीला म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी गोपाळकाल्याचा उत्सव हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. यावेळी शालेय मुख्याध्यापिका स्नेहल सोनवणे यांनी भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा ठेवलेला पाळण्याची पुजन करुन गोपाळकाला उत्साहाला सुरुवात करण्यात आली यावेळी शालेय समितीचे सदस्य वैभव पानगव्हाणे, संदिप कापसे, अजय गोळे उपस्थित होते यावेळी शालेय मुख्याध्यापिका स्नेहल सोनवणे यांनी गोपाळकाला सणाचे महत्त्व विशद करताना सांगितले की गोपाळकाला उत्साहाला सामाजिक ऐक्याची मांदियाळी असते. मुळात गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा,काला म्हणजे एकत्र मिसळणे पोहे, ज्वारीच्या लाह्या,धानाच्या लाह्या,दही,ताक, चण्याची भिजलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी मिसळून तयार झालेला खाद्यपदार्थ हा कृष्णास फार प्रिय होता असे सांगितले जाते.श्रीकृष्ण व त्याचे संवगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा खाद्यपदार्थ तयार करीत असत. श्रीकृष्ण जयंतीचा प्रसाद गोपालकाला म्हणून संबोधला जातो, कोकणात दहीकाला म्हटले जाते, भगवान श्रीकृष्ण बालपणी संवगड्यासह गोकुळात घरांमध्ये टांगलेल्या शिंक्यातील मडक्यातील दही-लोणी खात असत,त्याचे प्रतिक म्हणून मनोरे रचून दहिहंडी फोडली जाते यावेळी शालेय राधा कृष्ण वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला या सारख्या विविध गीतांवर ठेका धरला व शेवटी शालेय विद्यार्थ्यांनींनी दहिहंडी फोडून कार्यक्रमाची सांगता केली यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी अक्षरा निचित व समिक्षा निरभवने यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत