अन्य

निफाड येथील गटविकास अधिकारी महेश पाटील यांना प्रहार दिव्यांग,युवा आघाडी,विदयार्थी संघटनेचे निवेदन

Spread the love

दिनेश गोसावी / संपादक – दक्ष पोलीस वार्ता

                    दिव्यांग कल्याण योजना दिव्यांगाच्या दारी या योजनेअंतर्गत झालेला खर्च शासकीय निधीतून खर्च करणेबाबत आज निफाड गटविकास अधिकारी महेश पाटील यांना प्रहार विद्यार्थी युवा आघाडी दिव्यांग क्रांती यांच्या वतीने निवेदन देण्यात आले दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी योजना जनकल्याणकारी दिव्यांगाच्या दारी नाशिक येथे दिनांक ५/०९/२०२३ रोजी झालेल्या कार्यक्रमातील आलेला दीव्यांगासाठी खर्च ज्यात तालुक्यातील खेडोपाडी दिव्यांगासाठी ने आण करण्यसाठी वाहनांवर केलेला खर्च दिव्यांगासाठी लावलेले फलक यावरील खर्च व इतर दिव्यांगावरती केलेला खर्च हा त्यांच्या हक्कातील ५% दिव्यांग निधीतून वजा करू नये व ज्या ग्रामपंचायतीने केलेला खर्च हा दिव्यांग निधीतून दाखविण्यात येईल अश्या ग्रामपंचायतीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी यासंदर्भात आज निवेदन देण्यात आले यावेळेस प्रहार विद्यार्थी संघटनेचे नाशिक जिल्हाप्रमुख दत्ता आरोटे युवा उपजिल्हाप्रमुख जयेश जगताप दिव्यांग तालुका अध्यक्ष सोमनाथ धुमाळ विद्यार्थी संघटना उपजिल्हाप्रमुख साहिल शेख विकास पांगारकर आदी उपस्थित होते.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत