अन्य

नाशिक पालिकेचा डेटा चोरण्याचा अमेरिकन हॅकरचा प्रयत्न

Spread the love

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक

             महापालिका हद्दीतील नागरिकांसह, कर्मचारी व पालिकेशी संबंधित महत्त्वाचा डेटा क्रॅक करून संपूर्ण संगणक यंत्रणा ठप्प करण्याचा एका अमेरिकन हॅकरचा प्रयत्न माहिती व तंत्रज्ञान (आयटी) विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हाणून पाडला.

                 फायर वॉलवर चोवीस तास टकटक करून त्रस्त करणाऱ्या हॅकरला पळवून लावण्यास आयटी कर्मचाऱ्यांचे २४ तासांचे अथक प्रयत्न यशस्वी झाले.

                 गेल्या आठवड्यात संगणक यंत्रणा हॅक करण्याचा प्रयत्न झाला होता. आठवडाभर याची वाच्यता झाली नाही. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सायबर पोलिसांत तक्रारीची सूचना दिल्यानंतर या घटनेची माहिती सर्वत्र झाली.

              संगणक नेटवर्कमध्ये व्हायरस घुसल्याने संगणकीय यंत्रणा ठप्प झाली होती. ‘ग्लोबल आयपी ॲड्रेस’ तपासणीनंतर अमेरिकन हॅकर असल्याचे लक्षात आले. आयटी विभागाच्या यंत्रणेने चोवीस तास प्रयत्न करून हॅकरला पळवून लावले.

             महापालिकेच्या संगणक नेटवर्कमध्ये व्हायरस हटविण्याचे काम चोवीस तास सुरु होते. आयटी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन हॅकर व व्हायरस हटविला ही बाब कौतुकास्पद आहे.

-डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, म. न. पा. नाशिक

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत