अन्य

पाच किलो अफिमच्या बोंडाची पावडर व चुरा बाळगणाऱ्यास पोलिसांनी वाघोलीत पकडले वाघोलीतील तरुणावर गुन्हा दाखल 

Spread the love

सुमित अगरवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , पुणे

                    पुणे-नगर महामार्गावर वाघोली येथील लेक्सीकॉन शाळेजवळील दुकानासमोर सार्वजनिक रोडवर ५ किलो ७ ग्रॅम अफिमच्या बोंडाची पावडर व दोडा चुरा (पॉपी स्ट्रॉ) स्वतः जवळ बाळगल्याप्रकरणी वाघोलीतील एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली असून त्याच्यावर एनडीपीसी अॅक्ट अंतर्गत लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून ७६ हजार रुपये किमतीची अफिमच्या बोंडाची पावडर पोलिसांनी जप्त केली आहे. रुपाराम कालुराम बिष्णोई (वय २६, रा. बकोरी रोड, वाघोली,मुळगाव बाडमेर, राजस्थान) असे अफिमच्या बोंडाची पावडर विक्रीकरिता बेकायदेश बाळगणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक १ च्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत