अन्य

महिलांचा सन्मान दैनंदिन जीवनामध्ये दररोज करावा उपसभापती श्री प्रदीप वाघ यांचे प्रतिपादन

Spread the love

सौरभ कामडी / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , पालघर 

            जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वाकडपाडा,सुर्यमाळ,पाचघर,गोमघर,किनिस्ते , काष्टी येथे महिला दिनाच्या निमित्ताने बोलताना श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की महिला कायमच वंदनीय आहे,महिलांचा सन्मान रोज केला तर महिला दिन रोजच साजरा होईल,व महिलांचा आत्मसन्मान वाढेल, महिलांनी न घाबरता न डगमगता पुढे येऊन प्रत्येक कार्यात सहभाग घेतला पाहिजे, मुलींनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे, बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे मत श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.

                 महिला दिनाचे औचित्य साधून गावच्या विकासासाठी मोलाचे योगदान देण्यार्या महिलांचा सन्मान करण्यात आला.सांस्कृतिक कार्यक्रम, हळदकुंकू, होम मिनिस्टर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

                 ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला बचतगट, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम आयोजित केले होते.यावेळी श्री प्रदीप वाघ उपसभापती कार्यक्रमांचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते,कार्यमांचे अध्यक्ष म्हणून स्थानिक सरपंच सरपंच सौ लता वारे, सौ गीता गवारी, नरेंद्र येले,सौ.सुलोचना गारे,सौ.गौरी बोटे

                     तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ कुसुम झोले जिल्हा परिषद सदस्य,सौ आशा झुगरे पंचायत समिती सदस्य, श्री मिलिंद झोले, विष्णू हमरे, सौ.निर्मला पाटील, मंगेश दाते, श्री नंदकुमार वाघ उपसरपंच, श्री संजय हमरे,दशरथ पाटील,शिवराम हमरे, परशुराम अगिवले उपसरपंच रमेश बोटे, अशोक वाघ,कुशल खादे,हर्षदा खादे, अशोक वाघ इत्यादी पदाधिकारी उपस्थित. कार्यक्रमाचे नियोजन ग्रामसेवक व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत