अन्य

शहरातील अनेक हापसे बंद पडल्याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Spread the love

राजेंद्र कोल्हे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता, चांदवड

         चांदवड शहरातील अनेक हापसे बंद पडल्याबाबत दिनांक २४ जानेवारी २०२३ रोजी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले व प्रत माहितीसाठी जिल्हाधिकारी, चांदवड उप – विभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.

                 चांदवड शहरातील अनेक हापसे मागील तीन ते चार वर्षांपासून नादुरुस्त झालेले आहेत. शहरात ठिकठिकाणी सात ते आठ हापसे बंद पडलेले आहेत. यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. नगरपरिषदेने दिलेल्या नवीन नळांना देखील नियमितपणे पाणी येत नाही. व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे व नागरिकांची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

               चांदवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या मागील हापसा, पंचशीलनगर, वार्ड क्र. ९ मधील हापसे, पुरातन मारुती मंदिरासमोरील हापसा, तहसील कार्यालय रोड जवळील हापसा, डांबर विहिर रोड जवळील हापसेदेखील अनेक वर्षांपासून नादुरुस्त झालेले आहेत झालेले आहेत. काही हापश्यांत बिघाड झाला असल्याने पाणी हापसण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागते. तरीदेखील हापश्याला पाणी येत नाही. यामुळे महिलांना फार मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे. शहरातील बंद पडलेल्या हापश्यांबाबत नागरिकांनी नगरपरिषदेला अनेकवेळा तक्रारी अर्ज देवूनसुद्धा नगरपरिषद याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. यामुळे नागरिकांत अतिशय संतप्तेचे वातावरण निर्माण झालेले आहे.

                    चांदवड शहरातील नादुरुस्त झालेले व बंद पडलेले सर्व हापसे लवकरात – लवकर दुरुस्त करण्यात यावेत. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अाहिरे यांच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन व आमरण उपोषण छेडण्यात येईल. यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, याची प्रशासनाने नोंद घ्यावी.यावेळी सर्व महिला व नागरिक उपस्थित होते.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत