अन्य

गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या दोघांना वाघोलीतून केली अटक ; अंमली पदार्थ विरोधी पथक एक ची कारवाई आली आहे

Spread the love

सुमित अग्रवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता  

               गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या परप्रांतीयासह दोघांना गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने वाघोली येथून अटक केली असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, दोन मोबाईल असा ८५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे-नगर महामार्गावर सातव हायस्कूल बस स्टॉप समोर करण्यात शुभम शांताराम शिसवाल ( वय, १९, राह. गांधीनगर मुगार रोड,खंडवा, मध्य प्रदेश) आणि सनी संजय जेधे (वय २४, रा. लोणावळा) असे गावठी कट्टा विक्रीप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत.अंमली पदार्थ विरोधी पथक एक ला वाघोली बस स्टॉप समोर दोघेजण गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने सापळा रचून शुभम आणि सनीला ताब्यात घेतले. दोघांनाही अटक करून लोणीकंद पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून त्यांनी हे शस्त्र कोणाला विकण्यासाठी आणले होते याचाही शोध घेतला जात आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत