अन्य

जव्हार तालुक्यातील झाप ग्रामपंचायत मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

Spread the love

प्रशांत वांगड/प्रतिनिधी-दक्ष पोलिस वार्ता,जव्हार

                    जव्हार तालुक्यातील झाप ग्रामपंचायत मध्ये ७४प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.प्रथम ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. लोक नियुक्त सरपंच श्री.एकनाथ दरोडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सौ.भावनादेवी भगवान सांबरे इंटरनेशनल स्कूल झाप, आरोग्य केंद्र झाप, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शाळा झाप या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.७४प्रजासत्ताक ध्वजारोहण कार्यक्रमात उपस्थित झाप ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी व लोक नियुक्त सरपंच श्री.एकनाथ दरोडा व उप सरपंच श्री.सखाराम वड तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक वर्ग शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शाळा झाप येथील शिक्षक वर्ग ,सौ.भावनदेवी भगवान सांबरे इंटरनेशनल स्कूल झाप शाळेचे शिक्षक वर्ग, आरोग्य केंद्र झाप येथील कर्मचारी वर्ग, व विद्यार्थी, तसेच ग्रामपंचायत झाप येथील ग्रामस्थ उपस्थित होते.व तसेच शासकीय माध्यमिक आश्रमशाळा झाप या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत