सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक
मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट संचलित एम. इ. टी. भुजबळ नॉलेज सिटी आडगाव, नाशिक येथे संस्थेच्या विश्वस्त मीनाताई भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रस्तावीत ‘मीना भुजबळ स्कूल ऑफ एक्सेलन्स ” या स्कुलचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व मीनाताई भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, डॉ.जितेंद्र वाघ, प्रा.हरी नरके, दिलीप खैरे, मार्गदर्शिका डॉ.शेफाली भुजबळ संस्थेचे प्राचार्य, मान्यवर, स्टाफ, विद्यार्थी व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
अनेक वर्षापासून नाशिककच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून नाशिक येथे एक आगळीवेगळी शाळा निर्माण व्हावी अशी आग्रही मागणी लक्षात घेता संस्थेचे मुंबई एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मेट भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस आडगाव नाशिक येथे लवकरच एक शाळा निर्माण करण्याचे ठरविले आहे. या प्रस्तावित शाळेचे आज संस्थेच्या विश्वस्त मीनाताई भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भूमिपूजन करण्यात आले. या प्रस्तावित स्कूलचे नाव “मीना भुजबळ स्कूल ऑफ एक्सेलन्स” असे असणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधत राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या ‘इन फ्युजन लाईव्ह कॉन्सर्ट’ चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास राजकीय सामाजिक, साहित्य, कला, क्रीडा, उद्योग, शिक्षण यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. ‘इन फ्युजन लाईव्ह कॉन्सर्ट’ मध्ये महेश काळे यांच्या घेइ छंद मकरंद, हे सुरांनो चंद्र व्हा.. यासह शास्त्रीय गायन व फ्युजन ने रसिक मंत्रमुग्ध झाले होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037