अन्य

एस एम व्ही मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

Spread the love

रमिन काद्री – विभागीय संपादक – दक्ष पोलीस वार्ता , येवला.

                    तालुक्यातील बाभूळगाव येथील संतोष श्रमिक विद्यालय व कनिष्ठ महविद्यालय येथे आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

               या कार्यक्रमाप्रसंगी जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री. रुपेशभाऊ दराडे यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारले यांसह व्यासपीठावर डॉक्टर चव्हाण, डॉक्टर तिडके, डॉक्टर नागराज, डॉक्टर जाधव आणि सीमा सुरक्षा बलात कार्यरत असलेला येथील शाळेचा माजी विद्यार्थी शेखर बागुल आणि प्राचार्य येवले सर आदी मान्यवर होते. कार्यक्रमाची सूरवात सरस्वती पूजनाने झाली, त्यानंतर झेंडावंदन, राष्ट्रगीत आणि विविध देशभक्तीपर गीत झाले. इयत्ता ११ वी विज्ञान शाखेचा राहुल पवार याचे देशभकी वरील गीत तसेच ९ वी च्या विद्यार्थिनींचे नृत्य सर्वांचे आकर्षण ठरले. त्यानंतर हर्डल्स (अडथल्याची शर्यत) या क्रिडाप्रकारात राज्यस्तरावर द्वितीय आलेला ओम तनपुरे याचा तसेच भूगोल राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत प्रथम आलेला लाला जाधव तसेच द्वितीय दिनेश जाधव आणि तृतीय सुदर्शन बोठे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या नंतर अध्यक्षीय भाषण झाले. सूत्रसंचालन श्री. प्रदीप पाटील सर आणि श्री. खोकले सर यांनी केले तसेच विभाग प्रमुख श्री पैठणकर सर यांनी उपस्थीत मान्यवरांचे आभार मानले.

                उपप्राचार्य कदम सर, माध्यमिक विभाग प्रमुख श्री परदेशी सर, आव्हाड सर, भालेराव सर, गायकवाड सर, पिंगट सर आणि इतर शिक्षक वृंद तसेच ज्युनिअर कॉलेजचे श्री. खैरे सर, किरण गायकवाड सर, जाधव एन.बी सर, गोल्हाईत सर, समाधान गायकवाड सर, अनर्थे सर, देठे सर, मोहन सर, जाधव ए.डी सर, देवढे सर, काद्री सर, बाकळे सर, अरोरा सर, शाह सर, भड सर, कोल्हे सर, संसारे मॅडम, जाधव मॅडम, बोजगे मॅडम, फारुकी मॅडम आणि प्रयोगशाळा सहाय्यक कांगणे सर आदी शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क :- 98221 17037/98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत