अन्य

समृद्धी हायवें वर लकझरी बस चा टायर फुटून अपघात 24 जणांचा होरपळून मृत्यू

Spread the love

               विदर्भ ट्रॅव्हल्स ची बस ला समृध्दी महामार्गवर पुढील टायर फुटल्या ने ट्रॅव्हलचा बस भीषण अपघात झाला. अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्सने पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्स मधील 24 ते 25 प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाल्यांची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात बुलढाणा येथील सिंदखेड राजा येथील पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर झाला.

                      विदर्भ ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच 29 B E 1819 ही बस 30 जून रोजी सायंकाळी 5 30 वाजता नागपूर वरून पुण्याच्या दिशेने जात होती. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या धावत्या गाडी पूडील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.

              पलटी झाल्यानंतर ट्रॅव्हल्सने काही मिनिटामध्ये पेट घेतला. त्यानंतर गाडीचा डिझेल टाकीचा स्पोट होवून संपूर्ण ट्रॅव्हल पुर्णपणे जुळून खाक झाली. या ट्रॅव्हल्समधील अंदाजे 24 ते 25 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्स कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजा जवळ असलेल्या इंटरचेज वरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती

                अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. फायर ब्रिगेडच्या वाहनाने ट्रॅव्हल्सला विझवण्यात आले. ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

                 या गाडीचे चालक व वाहक सह 3/4 जण प्रवासी बचवल्याचे समजते , सद्या बचाव कार्य सुरू असून मृत्यू मुखी पडलेल्यांचा आकडा लवकरच समोर येणार आहे या गाडीत 29 प्रवासी होते , असे चालकाने सांगितले असून त्यात तीन चार लहान मुले आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत