अन्य

डुबेरे येथील तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू

Spread the love

                   सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील शेतकरी शरद कारभारी वामने वय 40 असे मुर्त्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून सतत पावसाची रिपरिप सुरु असून वामन ने हे कुटूंबासह शेतात काम करण्यासाठी गेले होते शेतातील काम उरकून 11/ वाजे च्या सुमारास घराकडे परतत असतांना पावसामुळे त्यांचा बांधा वरून पाय घसरून विजेच्या खांबा ला धक्का लागला असता त्यात वीज प्रवाह उतरला असल्याने त्यांना जोरदार धक्का बसून बेशुद्ध झाले त्यातच त्याचा मुर्त्यू झाला असून शरद वामने यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तसेच शरद यांच्या निधनामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला असून वीज वितरण कंपनीने त्यांना भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच ज्ञानेश्वर ढोली, माजी सरपंच अर्जुन वाजे, रामनाथ पावशे, शिक्षक नेते अंबादास वाजे, कारभारी वारुंगसे यांच्यासह आदींनी केली आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत