सुमित अगरवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , भीमा कोरेगाव
मागील अनेक दिवसंपापासून लोणीकंद परिसरात पुणे नगर महामार्गावरील किराणा माल दुकानाचेशटर उचकटून लाखो रुपयांचा किराणा माल व सीसीटीव्ही डीव्हीआर चोरून नेणाऱ्या टोळीतील टोळी प्रमुखाला कोंढवा पोलिसांनी अटक केली असून त्याने पुणे साथीदारांच्या मदतीने पुणे शहर, ग्रामीण भागातील चोरीचे एकूण ७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्याकडून तीन लाखांची आहे.रोकड, दोन वाहने, चोऱ्या करण्यासाठी लागणारी हत्यारे असा एकूण आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुरेंद्र असलारामजी चौधरी वय २८, रा. सौजाद ता. मारवाडी जंक्शन जिल्हा झालोर असे अटक केलेल्या टोळीप्रमुखाचे नाव आहे. त्याचे साथीदार नेमाराम उर्फडौलाराम चौधरी, भुंडाराम उर्फ राजु चौधरी पसार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.सुरेंद्र व त्याच्या साथीदारांनी लोणीकंद येथील मारुती ट्रेडर्स, व गुरुकृपा ट्रेडर्स किराणा मालाच्या दुकानातील चोरीसह उंड्री, कोंढवा, भोसरी, यवत, मंचर परिसरात चोऱ्या केल्याची कबुली दिली घरफोडया करणारी टोळी सासवड भागातील चांभळी गावात राहत असल्याची पोलिसांना मिळाली होती टोळीचा प्रमुख सुरेंद्र असलारामजी चौधरी हा साथीदारासह मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी चोरी करण्यासाठी बाहेर पडतो त्यांनी कोंढवा भागातही मोटार चोरी करुन घरफोडी केली आहे तो कान्हा चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पथकाने सापळा रचून सुरेंद्रला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने नेमाराम उर्फ डौलाराम चौधरी, भुंडाराम उर्फ राजु चौधरी यांच्या मदतीने चोऱ्या केल्याची कबुली दिली.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037