आनंद बन्सल / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , पुणे
कामात गांर्भिय नसणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले असून, 8 दिवसात दोन वेळा वाहन तोडफोडीची घटना घडल्याने पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचा रूद्रावतार पाहिला मिळाला. संबंधित पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ निरीक्षकांसह सात पोलिसांचे एकाचवेळी खात्यातून निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईने शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. तोडफोडीच्या घटनेपुर्वी चारवेळा दोन गटात वाद झाले होते.
त्याबाबत चारही वेळा अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्या वादाची गांर्भियाने दखल न घेतल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्यासह गुन्हे निरीक्षक मनोज शेंडगे, सहायक पोलिस निरीक्षक समीर शेंडे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, उपनिरीक्षक मारूती वाघमारे, पोलिस हवालदार संदीप पाटकुळे आणि पोलिस हवालदार विनायक जांभळे यांचे निलंबन करण्यात आले आहे. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवड्यात दोन वेळा वाहन तोडफोडीच्या दोन घटना घडल्या. वारजेमधील फरार गुन्हेगाराने मध्यरात्री वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली. याप्रकरणानंतर अवघ्या तीन दिवसांनीच स्थानिक तरुणांनी 8/10 वाहनांची तोडफोड केली. तोडफोड प्रकरणात पोलिसांनी परस्परविरोधीत गुन्हे दाखल केले. परंतु, चौकशीत वेगळीच माहिती समोर आली. दोन गटातील वादातून ही तोडफोड झाल्याचे समोर आले. दोन गटात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. वाहन तोडफोडपुर्वी त्यांच्यात चारवेळा वाद झाले होते. त्याप्रकरणात सहकारनगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा (एफ आर आय ) नोंद केला त्याची गांर्भियाने दखल घेतली नाही. त्याचवेळी कठोर प्रतिबंधात्मक कारवाई न केल्यामुळे तसेच तक्रारीची गांर्भीर्याने दखल घेतल्याने वाहन तोडफोडीपर्यंत टोळक्याची मजल गेली.त्यामुळेच वाहन तोडफोड झाल्याचे निष्पन्न झाले. गुन्हेगार न तपासणे, त्यांच्या हालचालींची माहिती न ठेवणे, तक्रार गांभिर्याने दखल न घेणे, कायद्याचा वचक न ठेवणे अशा पध्दतीचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवी करण्यात आली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037