अन्य

समर्थ पोलीस स्टेशन पथकाने मोबाईल चोरास शिताफीने पकडुन एकुण ०५,०९,०००/- किं चे एकुण २९ स्मार्ट फोन जप्त

Spread the love

आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

                    दि.०३/०७/२०२३ रोजी २१.०० वा पासुन दि.०४/०७/२०२३ रोजी ०२.०० वा पर्यंत ऑल आऊट ऑपरेशच्या अनुषंगाने समर्थ पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक कारवाई व गुन्हेगार चेकींग करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. त्याअनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार रोहिदास वाघीरे व पोलीस हवालदार जितेंद्र पवार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, एक इसम हातामध्ये पांढ-या रंगाची पिशवी घेवून नाना पेठ, मच्छी मार्केट येथे संशयास्पद उभा आहे, त्यावरुन त्यांनी तपास पथकातील अधिकारी सुनिल रणदिवे यांना बातमीचा आशय कळविल्याने तपास पथक अधिकारी व अंमलदार तात्काळ नाना पेठ, मच्छी मार्केट येथे पोहचुन प्राप्त बातमी प्रमाणे एक इसम संशयीतरित्या हातामध्ये सफेद रंगाची पिशवी त्यामध्ये काहीतरी समान घेवून जात असताना दिसुन आला त्यास हाटकले असता तो पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यास शिताफीने पकडुन त्याचे हातातील पांढ-या रंगाची पिशवीमध्ये मोबाईल असल्याचे आढळुन आल्याने त्यास नाव व पत्ता विचारता कुंदनकुमार अर्जुन माहातो,वय २५ वर्षे,रा. नयाटोला, कल्याणी महाराजपुर बजार, जिल्हा – साहेबगंज पोलीस ठाणे – तलझाडी राज्य – झारखंड सध्या राह. मुंबई अंधेरी चकाला मरुग पाईपलाईन साईबाबा मंदिराजवळ, मुंबई असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक तपास करता तो मुंबई येथुन पुण्यात येवून मच्छी मार्केटमध्ये मच्छी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरीकांचे मोबाईल चोरुन परराज्यात नेवून विकत असतो. त्याचे अंगझडती व घरझडतीतुन चोरीस गेलेले एकुण ०५,०९,०००/- किं चे एकुण २९ स्मार्ट फोन / मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

                    सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. प्रविण पाटील मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ पुणे शहर, श्री. संदीपसिंह गिल्ल मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग,पुणे. श्री. अशोक धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे, श्री. सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक सुनिल रणदिवे,सपोफौ दत्तात्रय भोसले, पोलीस हवा. रोहिदास वाघिरे, जितेंद्र पवार, गणेश वायकर, प्रमोद जगताप, पोलीस नाईक रहिम शेख, पोशि कल्याण बोराडे, अमोल शिंदे, शरद घोरपडे, संदिप पवार, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, हेमंत पेरणे यांनी केली आहे. पुणे शहर तसेच इतर पोलीस स्टेशनला मोबाईल चोरी संदर्भात गुन्हे दाखल असुन अधिक तपास पोउनि रणदिवे हे करीत आहेत.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत