अन्य

येरवडा पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई

Spread the love

आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

            पुणे शहरातील येरवडा पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे वनराज महेंद्र जाधव, वय-२० वर्षे, रा.लक्ष्मी नगर, येरवडा, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह कोरेगाव पार्क व येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी तलवार, लोखंडी सत्तुर, लोखंडी पालघन या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे, दंगा, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.

              प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम.पी. डी. ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे ०१ वर्षा करीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये श्री. बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशनपुणे व श्रीमती वैशाली चांदगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली.

                मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. मा. पोलीस आयुक्त यांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही २२ वी कारवाई असून, यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत