अन्य

ऑनलाईन खरेदी पडली महागात पुण्याच्या भामत्याने लावला व्यावसायिकाला तब्बल सव्वा कोटीला गंडा

Spread the love

आनंद बंसल /प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता 

काल पुण्यामध्ये भामत्याने एका व्यावसायिकाला सव्वा कोटी रुपयाला गंडा लावला. स्वताला ”मी ऑनलाइन पध्दतीने उत्पादनाची विक्री करणाऱ्या एका प्रसिध्द कंपनीचा वितरक आहे”’ असे सांगून विश्वास संपादन करीत एका व्यवसायिकाची सुमारे १ कोटी २० लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मिरजेचा एक भामटा चैतन्य उर्फ अंकित भाऊसाहेब पाटील, रा. कळंबी, ता. मिरज याच्या विरुद्ध पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या व्यवसायिकाची आरोपी चैतन्य ह्याच्याशी नुकतीच ओळख झाली होती. गृहोपयोगीसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कंपनीकडून स्वस्त दरात मिळवून देतो असे चैतन्याचे आमिष दाखविले आणि त्याचे विश्वास संपादन करण्याकारिता आरोपीने मुद्दाम सुरवातीला लॅपटॉप, मोबाईल संच सरुवातीला १८ लाख रूपयांचा माल स्वस्तात दिला. त्यावर व्यवसायिकाचा विश्वास बसला. नंतर त्याने हळूहळू खरेदीसाठी पैशांची मागणी करीत अद्याप पर्यंत १ कोटी २० लाख रुपये व्यापाऱ्याकडून आगाऊ रक्कम घेतली व लवकरच माल पुरविते असे सांगून गेला. व्यापाऱ्याने त्याला वस्तू आणून दे असे वारंवार सांगितले पण त्याने नंतर थापा मारून उडवाउडवीची उत्तरे दिली. थोड्याच दिवसानी आपली फसवणूक झाल्याचे व्यवसायिकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने चैतन्य विरूद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत