अन्य

२६/११चा भीषण थरार, धावणारी मुंबई हादरुन गेली; कित्येक निष्पाप बळी अन् पोलिस, जवानांचा जज्बा!

Spread the love

राजेंद्र कोल्हे/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,चांदवड

                 २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा परिणाम संपूर्ण जगभरात पाहायला मिळाले. या हल्ल्यात भारतीयांसह अनेक परदेशी नारिकांचाही मृत्यू झाला होता. मुंबई हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं.

                    २६ नोव्हेंबरचा दिवस अनेकांसाठी इतर दिवसांप्रमाणे सामान्य होता. २००८ साली मात्र मुंबईकर आणि संपूर्ण देशासाठी हा काळा दिवस ठरला. २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ल्याला आज १४ वर्षे पूर्ण होत आहेत. १४ वर्षांनंतरही आज २६/११ मुंबई हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी, कटू आठवणी प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम आहेत.

                  २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा परिणाम संपूर्ण जगभरात पाहायला मिळाले. या हल्ल्यात भारतीयांसह अनेक परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला होता. मुंबई हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं. २००८ मध्ये पाकिस्तानमधून दहा दहशतवादी समुद्राच्या मार्गे मुंबईत घुसले होते. लष्कर ए तोयबाच्या या अतिरेक्यांनी मुंबईची शान म्हणून ओळख असेलल्या ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता, ज्यात १६० हून अधिक निरपराधांचे प्राण गेले होते.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत