अन्य

नैताळे परिसरात अतिवृष्टीची अनिल कदम यांच्याकडून पाहणी

Spread the love

दिनेश गोसावी/संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्युज

               निफाड तालुक्यातील नैताळे, रामपुर, कोळवाडी व सोनेवाडी येथे ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी मा.आमदार अनिल कदम यांनी आज रविवारी केली. यावेळी प्रांत अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे यांच्याशी संपर्क करुन तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित मंडळ अधिकारी निफाडे, तलाठी खंडागळे, तलाठी गांगुर्डे यांनी वरिष्ठांच्या निर्देशाने पंचनामे करणार असल्याचे सांगितले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीवेळी अनिल कदम यांच्या समवेत पिंपळगाव बाजार समितीचे माजी संचालक गोकुळ गिते, नैताळे येथील शेतकरी संजय बोरगुडे, अरविंद बोरगुडे, रतन बोरगुडे, पोलीस पाटील आत्माराम बोरगुडे, योगेश बोरगुडे, बापू बोरगुडे, सोनेवाडी येथील शेतकरी प्रकाश आरोटे, दिलीप पडोळ, रामदास पडोळ, संजय पडोळ, माधवराव निचिंत, कोळवाडीचे रावसाहेब गोळे, रविंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत