अन्य

नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यावर अज्ञातांकडून हल्ला

Spread the love

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

                  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिकमधील महिला पदाधिकारी व मणिशंकर नेत्र रुग्णालयाच्या संचालिका डॉ. प्राची पवार यांच्यावर मंगळवारी रात्री अज्ञातांच्या टोळक्याने हल्ला केल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात प्राची पवार ह्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी शुश्रुत हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं आहे.

                 नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवर्धन शिवारात हा हल्ला झाला आहे. प्राची पवार यांचे या परिसरात फार्म हाऊस असून त्या तिथे गेल्या असताना हा हल्ला करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं आहे.

              पवार यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला नेमका काय कारणामुळे झाला, याची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही.

              प्राची या मविप्र संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत पवार यांच्या कन्या आहेत. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत