आनंद अगरवाल / प्रतिनिधि – दक्ष पोलिस वार्ता
मा. पोलीस आयुक्त सो, श्री. अंकुश शिंदे सो, नाशिक शहर मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ – २ मोनिका राउत सो, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. शेखर देशमुख साो, यांनी चोरी करणारे यांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत अंबड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ यांना सुचना व मार्गदर्शन केले होते.
दिनांक २९/२०७/२०२३ रोजी अंबड पोलीस ठाणेस मनोहरलाल गोपीचंद गुलाटी रा- शिवशक्ती बंगला, प्रसाद नगर, ओम कॉलणी, उपेंद्रनगर, सिडको, नाशिक यांनी तक्रार दिलेली होती कि त्यांचे ऑफिस मध्ये काम करणारा ईसम नामे दिपक पिरूनाथ योगी याने त्यांचे घरातील कपाटात ठेवलेले ३ लाख २५ हजार रूपये चोरी करून पळुन गेला म्हणुन त्याचेविरूध्द अंबड पोलीस ठाणेस गुरनं ४८१ / २०२३ भादविक ३८१ प्रमाणे दिनांक २९/०७/२०२३ रोजी २०:५५ वा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयातील आरोपी व मुदमालाचा तपास लवकरात लवकर करावा असे आदेश मा. वरिष्ठ पोलीस निरक्षक यांनी गुन्हे शोध पथकास दिले असता गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोशि १५६६ सागर जाधव व पोशि २३९१ संदिप भुरे यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशिर बातमी मिळाली की, सदर दाखल गुन्हयातील आरोपी नामे दिपक पिरूनाथ योगी वय २२, रा- शिवशक्ती बंगला, प्रसाद नगर, ओम कॉलणी, उपेंद्रनगर, सिडको, नाशिक हा गुन्हयातील चोरीच्या रकमेसह व त्याचे साथीदारांसह गरवारे पॉईन्ट अंबड नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने तांत्रिक विश्लेषण विभाग नाशिक शहर यांची मदत घेवुन गुन्हे शोध पथकाचे पोउनि नाईद शेख पोना २०९८ पवन परदेशी, पोशि २०५४ सचिन करंजे, पोशि २५४७ समाधान शिंदे, पोशि २३४६ तुषार मते अशांनी गरवारे पॉईन्ट येथे सापळा रचुन इसम नामे १) दिपक पिरूनाथ योगी वय २२, रा- शिवशक्ती बंगला, प्रसाद नगर, ओम कॉलणी, उपेंद्रनगर, सिडको, नाशिक व त्याचे साथीदार २) निलेश बाघसिंग राजपुत वय २२, रा- रूम नं ४, दुसरा मजला, मेहतर कॉम्प्लेक्स, कोटक महिंद्रा बँक समोर, इंदिरानगर, नाशिक मुळ रा- मेधपुर सिटी, सेखाखेडी गाव, मध्यप्रदेश ३) राम बालुजी भिलवाडा, वय २३ रा रा रूम नं ४, दुसरा मजला, मेहतर कॉम्प्लेक्स, कोटक महिंद्रा बँक समोर, इंदिरानगर, नाशिक मुळ रा- मेधपुर सिटी, लाखाखेडी गाव, मध्यप्रदेश यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन सदर गुन्हयातील ३ लाख ०५ हजार ४०० रूपये रोख रक्कम हस्तगत करून आरोपींना अटक केले.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त मोनिका राउत, परिमंडळ – ०२, सहा पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख, अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघ व पोनि अजय नजन (क्राईम) यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोउनि नाईद शेख व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोना १८४८ किरण गायकवाड, पोना २०९८ परदेशी, पोशि २०५४ करंजे, पोशि २३९१ संदिप भुरे, पोशि २५४७ समाधान शिंदे, पोशि २२२९ घनश्याम भोये, पोशि १५६६ सागर जाधव, पोशि २०९३ राकेश पाटील, पोशि २३४६ तुषार मते, पोशि २६९७ प्रविण राठोड, पोशि ९३० राकेश राउत, पोशि २००३ अनिल गाढवे यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोना १८८५ के के देशमुख हे करीत आहेत.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037