आनंद अगरवाल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता
बनावट आधार कार्डच्या माध्यमातून ५० च्या वर सीमकार्ड विकणाऱ्या व्यावसायिकांवर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात लातूरच्या दहशतवाद विरोधी शाखेने कारवाई करून उदगीर येथील एका स ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र सायबर कार्यालय मुंबई यांनी बनावट सीमकार्ड विक्री करणाऱ्या व्यवसायिकावर कारवाई करण्यासंदर्भात पोलिस अधीक्षकांना पत्र देऊन कळविले होते. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केल्यावरून दहशतवाद विरोधी शाखा, लातूर यांनी उदगीर येथे कारवाई करीत एकास ताब्यात घेतले असून त्याने एकूण ४८ सीमकार्ड बनावट कागदपत्रांचे आधारे अॅक्टिव्हेट करून इतरांना वापरण्यास दिल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी शिवकुमार महादेव आंबेसंगे (२७) रा. आंबेसंगे गल्ली, चौबारा रोड, उदगीर सध्या रा. विजय कॉलनी, शिवाजी विद्यालयाजवळील एका अपार्टमेंटमध्ये याने सदर सीमकार्ड विक्रेत्यांकडून ग्राहकाने दिलेले आधार कार्ड आणि फोटोचा गैरवापर करीत एकाच नावाने अनेक सीमकार्ड नोंदवल्याचा प्रकार उघड झाला आहे.
या संशयित आरोपीने सन २०१७ मध्ये उदगीर नगर परिषद कॉम्प्लेक्स येथे व्हीआयपी कम्युनिकेशन नावाचे दुकान सुरू केले होते. त्या दरम्यान मोबाईल टेलिकॉम कंपन्यांचे सीमकार्ड जास्तीत जास्त विक्री व्हावी यासाठी ग्राहकांना अनेक प्रलोभने दिली यातून सदर विक्रेत्याने ग्राहकांकडून मिळालेला आधार कार्ड आणि फोटोंचा गैरवापर करीत एकाच्याच नावे अनेक सीमकार्डची विक्री दाखवत कंपन्यांची फसवणूक केली. दहशतवाद विरोधी शाखा, लातूर येथील पोलिस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या फिर्यादीवरून नमूद आरोपीविरुद्ध पोलिस ठाणे उदगीर शहर येथे माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद संशयित आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037