अन्य

गुन्हयातील आरोपीतांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करून पोलीस आयुक्त यांचा गुन्हेगारांवर वचक

Spread the love

आनंद अगरवाल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

                मा.श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी उपनगर पोलीस स्टेशन कडील गुरनं ३०२/२०२३ भादवि कलम ३९५, ३०७, ३२३, ५०४, ५०६, ४२७ सह शस्त्र अधिनियम ४ / २५ व मपोकाक १३५ प्रमाणे दाखल गुन्हयात निष्पन्न ९ आरोपींविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ (मोक्का) या कायद्यान्वये कारवाई करण्याचे दिनांक २९/०७/२०२३ रोजी आदेश निर्गमीत करून जनजिवन विस्कळीत करणा-या | आरोपींविरूद्ध कठोर कारवाईचे पावले उचलण्यात आली आहेत.

              गुन्हयाची हकीगत – दिनांक २४/०७/२०२३ रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हयातील आरोपी यांनी संगनमत करून फिर्यादी यांना जिवे मारण्याची धमकी व मारहाण करून बळजबरीने फिर्यादीचे खिशातील पैसे काढुन घेवुन व आरोपीतांनी त्यांचे हातातील धारधार शस्त्राने | फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपीतांनी त्यांचे हातातील धारधार शस्त्राने इतर नागरीकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडुन नुकसान करून परिसरात दहशत निर्माण केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाणे येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत