हरिश शिंदे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता
मोखाडा तालुक्यातील पाचघर हे गाव तालुक्याचे शेवटचे टोक पाचघर येथे जाण्यासाठी कारेगाव ते पाचघर रस्ता जोडला गेला आहे या रस्त्यावर मोठा नाला असून त्यावर एक पूल बांधला आहे परंतु या पुलावर दरवर्षी मुसळधार पाऊस चालू झाला की पुलावरून पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत असतो तसेच या गावाला जोडणारा पर्यायी मार्ग नसल्याने या एकच मार्गाने जाता येता येते . दरवर्षी हा पूल पाण्याखाली जात असल्याने पुलाचा काही अंशी भाग दरवर्षी तुटून वाहून जात असतो पाऊस उघडला की पुलाचे दुरुस्तीचे काम म्हणून काही प्रमाणात मलमपट्टी केली जाते हे दरवर्षी चालूच असते आणी म्हणूनच यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे आणी या गावाचा संपर्क तालुक्याशी कायम रहावा कितीही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला पूर आला तरी त्याचा पुलावर काहीही परिणाम होणार नाही म्हणून या पुलाची उंची वाढवून पुलाचे बांधकाम भक्कम करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी शासन व प्रशासन यांच्याकडे केली आहे .
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037