अन्य

अंकुश शिंदे नाशिकचे नवे पोलिस आयुक्त तर सुनील फुलारी विशेष पोलिस महानिरीक्षक

Spread the love

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

                  नाशिक शहराचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे आणि नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांची बदली झाली आहे. अंकुश शिंदे यांची नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

                 यासह विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या जागी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

               जयंत नाईकनवरे यांनी नाशिकसह सातारा, वर्धा, पुणे, मुंबई जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी विशेष उपक्रम राबविले. यात प्रामुख्याने रात्री फिरते बॅरिकेडींग विशेष उल्लेखनीय आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत