सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील तैलबैल गडावर ट्रेक करताना रोप तुटल्याने २०० फूट खाली कोसळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सह्याद्रीची घोरपड म्हणून ओळखले जाणारे सोमनाथ बळीराम शिंदे (वय २५ रा. कात्रज) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. काल सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
सोमनाथ हा काल त्याच्या नऊ तरुणांसह तैलबैल गडावर ट्रेकसाठी गेले होते. ते प्रत्येक गडावर पुढे जाऊन रोप बांधत असतात. पण काल सकाळी सोमनाथ हा गडावर पुढे जाऊन रोप, दोर बांधण्याचे काम करीत होता. त्याच्या पाठीमागून दोराच्या साह्याने उर्वरित तरुण गडावर चढाई करणार होते. काल सकाळी साडे नऊ वाजता दोर तुटल्याने सोमनाथ खाली १०० फूट कोसळला. त्यानंतर तेथून पुन्हा १०० फूट आणखी खाली कोसळला. दोनशे फूट खाली कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे गिर्यारोहकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 98221 17037 / 98228 17037